गंधर्वकृत रामस्तुती

गंधर्वकृत रामस्तुती

(कबंध राक्षस)
रामा तुझी स्तुती करण्यासाठी माझे मन अत्यंत उत्सुक झाले आहे.
तुझे स्वरूप अनंत आहे.
तुला आरंभ नाही की अंत नाही.
मनाला आणि वाणीला तुझे वर्णन करता येत नाही.
तुझे सूक्ष्मस्वरूप हे, विराट्‌ आणि हिरण्यगर्भ या दोन्ही देहांहून वेगळे आहे.
ते केवळ ज्ञानमय आहे. ते कोणालाही समजणे कठीण आहे. ते सोडून इतर सर्व जड आहे.
हिरण्यगर्भ हे तुझे सूक्ष्मशरीर असून विराट्‌ हे तुझे स्थूलशरीर आहे.
तुझे सूक्ष्मस्वरूप हा ध्यानाचा विषय असून ते ध्यान करणारांचे कल्याण होते. या ध्यानाने जगातील भूत, वर्तमान आणि भविष्य या सर्वांचे ज्ञान होते.मन – चंद्र
बुद्धी - बृहस्पती
अहंकार- रुद्र
वाणी - वेद
दाढा - यम
दंतपंक्ती - नक्षत्रे
हास्य – जगाला मोह घालणारी माया
कटाक्ष – सृष्टी
शरीराचा पुढचा भाग – धर्म
पृष्ठभाग – अधर्म
डोळ्यांचे उघडणे / मिटणे - दिवस / रात्र
उदर – सात समुद्र
नाड्या - नद्या
केस – वृक्ष / वनस्पती
रेत – पर्जन्य
मोठेपणा - ज्ञानशक्ती
तुझ्या या स्थूलरूपाच्या ठायी मनुष्यांनी आपले चित्त ठेवणे म्हणजे अनायासे मुक्ती मिळवणे आहे.
म्हणून, हे रामा, मी तुझ्या स्थूलरूपाचे चिंतन करतो. या रूपाचे ध्यान केले की प्रेमरस उत्पन्न होतो आणि शरीर रोमांचित होते.
तुझे आता दिसणारे रूप सर्वदा माझ्या अंत:करणात राहो.
श्रीशंकर पार्वतीसह सतत तुझे ध्यान करीत असतात. काशीनगरीत राहून आसन्नमरण झालेल्या लोकांना तारणारे आणि ब्रह्मतत्त्ववाचक असे तुझे नामच उपदेश करून संतुष्ट मनाने सांगत असतो.
तूच परमात्मा आहेस हे निश्चित.
सर्व लोक मायेमुळे मोहित झाल्याने तुझे स्वरूप यथार्थ रीतीने जाणत नाहीत.
हे जगन्नाथा, माझे रक्षण कर,
तुझी माया मला मोहित न करो.

॥श्रीराम समर्थ॥