महिन्यानुसार धार्मिक कार्ये

महिन्यानुसार धार्मिक कार्ये -
--------------------
चैत्र ते फाल्गुन महिन्यात येणारे कुलाचार येथे देण्याचा प्रयत्न केला आहे.

हे कुलाचार दोन प्रकारचे आहेत
१) सर्वांना कॉमन (लागू होणारे)
२) प्रत्येक कुलाचे स्वतंत्र

--------------------------
- प्रत्येक साधकाने आपल्या कुलवृत्तांतात दिल्याप्रमाणे, या यादीत दिलेल्या आचारांपैकी, कोणते कराय़चे आहेत ते समजून घ्यावे.
- आपल्या डायरीत वर्षात केव्हा काय कराय़चे आहे त्याची नोंद करावी.
- महिना बदलताना येणार्‍या महिन्यात काय कराय़चे आहे ते समजून घ्यावे व त्याप्रमाणे आधी तयारी करुन ठेवावी.
- हे सर्व करताना भगवत्‌भाव महत्वाचा आहे हे लक्षात असावे.
- आपली आर्थिक परिस्थिती लक्षात घ्यावी, घरातील पाठबळ किती आहे याचा अंदाज घ्यावा. मुख्य म्हणजे त्या निमित्ताने "परमात्मा कर्ता आहे" याचे स्मरण ठेवावे.
- देखावा करणे, प्रशंसा मिळवणे, अथवा देवाला काही मागणे यासाठी हे करु नये.
- परमेश्वर प्रीत्यर्थ्य सर्व सेवा असावी.
- आपण काय केले तर देवाला आवडेल अशा भावनेने करावे.
- कोणी काय करावे, किती खर्च करावे यावरुन वितंडवाद होऊ नये.
- देवाची सेवा म्हणून करावे.
----------------------------
- घरगुती उत्सव (घरातील कुटुंबीयांशी बोलून ठरवणे)
- गुरुजींच्या मदतीने कराय़चे कुलाचार (आपल्या कुलोपाध्यायांशी बोलून ठरवणे)
- कोरडे साहित्य खरेदी
- आयत्या वेळची खरेदी (फुले, फळे,विड्याची पाने इ.)

॥श्रीराम समर्थ॥