श्रीरामाचा लक्ष्मणाला उपदेश

लक्ष्मणाचा प्रश्न – मोक्षप्राप्तीचा निश्चित मार्ग कुठला? -
श्रीराम –
हे गुह्यातिगुह्य आहे.
हे ज्ञान झाल्याने मनुष्याचा काल्पनिक भ्रम दूर होतो.
---------------------
मायेचे स्वरूप
शरीराच्या ठिकाणी मी अशी बुद्धी मायेमुळे होते.
तिच्या अस्तित्त्वामुळे हा संसार कल्पिला जातो.
------------------------
मायेची रूपे -
१) विक्षेप – महत्‌तत्त्वापासून – ब्रह्मदेवापर्यंत भेद भासणार्‍या जगाची कल्पना
२) आवरण – ज्ञानरूपाचे आच्छादन
-----------------------------------------
परमात्म्याच्या आश्रयावर विश्वाची रचना
माणसे जे ऐकतात, पाहातात, स्मरतात ते सर्व असत्य किंवा एखाद्या स्वप्नाप्रमाणे अथवा मनोरथाप्रमाणे खोटे / भासमय असते.
संसारवृक्षाचे मूळ (दृढ) हा देह आहे.
या मूळाचे बंध - पुत्र, स्त्री इ. विषयींचे बंध
स्थूलदेह (स्थूलभूतांचा), ५ सूक्ष्मभूते, अहंकार, बुद्धी, दशेंद्रिये, चैतन्याचे प्रतिबिंब, मन, मूलप्रकृती या सर्वांना क्षेत्र (देह) असे म्हणतात.
या सर्वांहून जीव वेगळा आहे.
-------------------------------------
ज्ञानाची साधने
दंभ, हिंसा यांचा त्याग करावा.
दुसर्‍याने केलेली निंदा सहन करावी.
सर्व बाबतीत सरळपणा ठेवावा.
मन, वाणी, शरीर यांनी उत्तम भक्ती करावी.
सद्‌गुरुंची सेवा करावी.
आंतर्बाह्य शुद्धी ठेवावी.
सदाचरण करताना स्थिरता ठेवावी.
मन, वाणी, शरीर यांचा निग्रह करावा.
विषयांबाबत अनासक्त व्हावे.
अहंकार सोडून द्यावा.
जन्म – जरा (म्हातारपण) इ. चा विचार करावा.
संसाराच्या ठिकाणी अनासक्त व्हावे.
पुत्र, दारा, धन याविषयी स्नेहशून्य व्हावे.
इष्ट / अनिष्ट स्थितीमध्ये चिताची समता कयम ठेवावी.
सर्वांच्या अंतर्यामी असणार्‍या रामाच्या ठिकाणी अनन्य बुद्धी लावावी.
शुद्ध, पवित्र, एकांतस्थळी राहावे.
जनसमुदायाबरोबर प्रेमसंबंध ठेऊ नयेत.
आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी सतत उद्योग करावा.
वेदांताच्या अर्थाचे अवलोकन करीत राहावे.
----------------------------------------
ज्ञान – विज्ञान
जे जाणलं जातं ते ज्ञान
ज्याचा साक्षात्‌ अनुभव येतो ते विज्ञान
आत्मा - सर्वत्रपूर्ण, पूर्णज्ञानानंदात्मक, अव्यय, विकाररहित, निरूपाधिक, परिणामरहित, स्वयंप्रकाशी (देहाला प्रकाशित करतो), आवरणविरहित, एकमेवाद्वितीय, संगरहित, सर्वसाक्षी
-------------------------------------
त्याचा अनुभव कसा येतो? -

आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले की तो जाणला जातो, गुरुंकडून शास्त्रोपदेश होऊन जीवात्मा आणि परमात्मा यांचे ऐक्यज्ञान होते, तेव्हा माया, परमात्म्याच्या स्वरूपी लय पावते. याला ‘मुक्ती’ म्हणतात.
--------------------
रामाचे विशेष सांगणे -
माझी भक्ती जे करीत नाहीत त्यांना मुक्ती (स्वरूपाची प्राप्ती) दुर्लभ असते; माझी भक्ती ज्यांच्या ठिकाणी युक्त असते, त्यांना आत्मस्वरूप स्पष्टपणे दिसू लागते.
-----------------------
रामाची भक्ती कशाने होते?
- रामभक्तांची संगती, माझी सेवा, माझ्या भक्तांची सेवा, एकादशीचा उपवास, रामाच्या विशेष पर्वदिनी उत्सव आनंदाने करणे, माझी कथा ऐकण्यात गोडी असणे, कथेचे पाठ करण्यात गोडी असणे, कथेचे व्याख्यान करण्यात गोडी असणे, माझ्या पूजेसंबंधात विशेष निष्ठा असणे, माझ्या नामाचे सतत कीर्तन करणे, माझ्या ठिकाणी सतत आसक्त होऊन राहाणे.॥श्रीराम समर्थ॥