अगस्त्यऋषीकृत रामस्तुती

अगस्त्यऋषीकृत रामस्तुती
ब्रह्मदेवाने रावण वधासाठी तुला अवतार घेण्याची विनंती केली तेव्हापासून मी तुझ्या दर्शनाची आकांक्षा बाळगतो आहे. इतर मुनींसह मी तुझेच चिंतन करीत तप करतो आहे.
सृष्टी उत्पन्न होण्यापूर्वी तू एकच एक निर्विकल्प व उपाधीरहित होतास. तुझ्या ठिकानी माया आश्रय घेऊन विषयत्त्वाने शक्तीरूप असते.
माया तुला आवृत्त करते, तिला अव्याकृत म्हणतात.
तिचे इतर नावे - मूलप्रकृती, माया, अविद्या, संसृती, बंध
तुझ्याकडून क्षुब्ध झाली की ती महत्तत्त्व प्रसवते.
तुझ्याकडून प्रेरणा मिळाली की महत्‌ तत्त्वापासून अहंकार उत्पन्न होतो.

विद्या कोणाला प्राप्त होते? - जे तुझी भक्ती करतात, तुझ्या नाममंत्राची उपासना करतात.
विद्यावान्‌ मुक्त होऊ शकतात.
साधुसंगतीशिवाय मोक्ष नाही.
साधू - सर्वत्र समदृष्टी, निस्पृह, इंद्रियनिग्रही, शांतचित्त, भक्तीत आसक्त, निर्वासन, सुखदु:खाशी असंग, विनासक्त, संन्यस्त, ब्रह्मरूपात रममाण, अष्टांगयोगी, संतोषी, तुझ्या कथेच्या श्रवणाची आवड असणारे.
साधुसमागम झाल्यानंतर तुझ्या ठायी भक्ती उत्पन्न होते. नंतर प्रत्यक्ष तत्त्वाचे ज्ञान प्राप्त होते.
-------------------------
प्रार्थना -
म्हणून हे श्रीरामा - तुझ्या ठायी मला प्रेमरूप भक्ती दे, तुझ्या भक्तांची संगती मला घडो. सीतेसह नित्यचितात वास असावा, सदासर्वकाळ तुझेच स्मरण व्हावे.

॥श्रीराम समर्थ॥