सुतीक्ष्णकृत रामस्तुती

सुतीक्ष्णकृत रामस्तुती
मी तुझ्या नावाच्या मंत्राचा जप करीत असतो.
तुझे गुण अनंत आहेत.
तुझ्या स्वरूपाला मर्यादा नाहीत.
तुझ्या चरणांचा आश्रय ब्रह्मदेव व शंकरही करतात.
तुझे पाय म्हणजे संसारसमुद्र तरून जाण्याची उत्तम नौका आहे.
तू सर्वांना रमविणारा आहेस.
मी तुझ्या दासांचा दास आहे.
तुझ्या स्वरूपाचे ज्ञान कोणालाही होत नाही.
मी तुझ्या मायेने मोहित झालेला, अंध:काराच्या विहिरीत बुडलेला, देहाशी बद्ध झालेला आहे.
तू सर्वांच्या हृदयात राहातोस.
जे तुझ्या नाममंत्राचा जप करण्यापासून परावृत्त झालेले असतात, त्यांच्यावर तू आपली माया पसरवतोस.
जे तुझ्या नाममंत्राच्या साधनेत तत्पर असतात, त्यांच्यापासून तुझी माया दूर जाते.*
तू तुझ्या भक्तांना त्यांच्या सेवेला अनुरूप असे फल देतोस.
जगाची उत्पत्ती, संहार आणि पालन या सर्व स्थितींना तूच एकमात्र कारण आहेस.
तुझ्या त्रिगुणात्मक मायेने जे मोहित होतात ते तुला विविध रूपांत पाहातात.
सूर्य विविध आकारांच्या भांड्यांत प्रतिबिंबित होतो त्याप्रमाणे, ज्यांची अंत:करणे तुझ्या मंत्राच्या जपाने पवित्र झालेली आहेत, अशांच्याच अंत:करणांत तू प्रसन्नपणे वास्तव्य करून असतोस.
रूपाचे सुंदर वर्णन -
तुझे हे रूप माझ्या हृदयात नित्य राहो, एवढीच माझी इच्छा आहे.
रामाचे आशीर्वचन
माझ्या उपासनेने तुमचे चित्त निर्मल झाले आहे, म्हणूनच मी आपल्या भेटीला आलो आहे.
माझी भक्ती करण्यावाचून अन्य साधन नाही.
या जगात जे माझ्या मंत्राची उपासना करतात, मलाच शरण येतात, अन्य कशाचीही अपेक्षा बाळगत नाहीत, अन्यत्र कुठेही जात नाहीत, प्रतिदिनी त्यांना फक्त माझेच दर्शन होते.
ज्या स्तोत्राने तू माझी स्तुती केलीस त्याचे जे कोणी नित्य पठण करील त्याची माझ्या ठिकाणी भक्ती जडेल, त्यालाच शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होईल.
माझ्या उपासनेमुळे तू मुक्त झाला आहेस.
देह त्यागल्यावर तू माझ्या स्वरूपाशी एकरूप होशील (सायुज्य)