कैकेयी राम संवाद

कैकेयीचा खेद व रामस्तुती

- देवकार्यासाठी मला प्रेरणा दिलीस व मी मात्र पापाचरण केले.
- तू इतका दुर्लभ असूनही मला दर्शन दिलेस.
- पुत्र, वित्त इत्यादिकांचे पाश, माझ्या मनातील त्यांच्याविषयीचा स्नेह यांचा छेद तू ज्ञानरूपी निर्मळ खड्‌गाने करावा.
- मी तुला शरण आले आहे.
----------------------------------------
कैकेयीला रामाने केलेला उपदेश

- ज्या वाणीची मी तुझ्या ठायी प्रेरणा केली तीच तुझ्या तोंडातून निघाली आहे.
- देवांचे कार्य होते आहे असे समज.
- अंत:करणाने रात्रंदिवस माझं नित्य चिंतन करीत राहा.
- माझी भक्ती केली की आसक्ती नष्ट होईल आणि तू मुक्त होशील.
- मी सर्वत्र समदृष्टी ठेऊन असतो. प्रेम वा द्वेष इतर माणसांना जसे वाटते तसे मला वाटत नाही.
- माझी भक्ती करणार्‍यांना मीही भजतो.
- माझ्या मायेने मोहित झालेले लोक मला मनुष्य दृष्टीने पाहातात, ते माझं सत्यस्वरूप जाणत नाहीत.
- माझ्यासंबंधीचे हे ज्ञान तुला झाल्याने भवदु:ख नाहीसे होईल.
- माझे स्मरण करीत तू घरीच राहा, म्हणजे तू कर्मांनी लिप्त होणार नाहीस.

॥श्रीराम समर्थ॥