ऋक्‌वेद

ऋ‍क्‌वेदविशेष - या ग्रंथात ज्ञाती (जाति), लिंग, वर्ण, धन, ज्ञान यामुळे उत्पन्न होणार्‍या कृत्रिम उच्च-नीचतेचा मागमूसही आढळत नाही.
हा ग्रंथ सर्वसंग्राहक व सर्वसमावेशक आहे. जगातील जनतेसाठी धर्मग्रंथ रचण्याची प्रेरणा यात दिसते.
समाजातील सर्व थरांतील उपासनांचा सारखाच आदर यात केलेला आहे.

धर्माच्या चौकटीत मनुष्याचा विकास होऊन समाज सुस्थिर पायावर उभा रहावा ही तळमळ यात दिसते.
जगातील हा आद्यग्रंथ कोणत्याही एका धर्माचा अथवा पंथाचा नसून समस्त मानवज्ञातीचा धर्मग्रंथ आहे (मॅक्सम्युलर).

बहिरंग -

- एकूण ऋचा अथवा मंत्र - १०५५२
- अध्यायांची (सूक्तांची संख्या) - १०२८
- विभाग (मंडले) - १०
----------------------
मंडल १- सूक्तसंख्या - १९१ ऋचासंख्या - २००६
मंडल २- सूक्तसंख्या - ४३ ऋचासंख्या - ४२९
मंडल ३- सूक्तसंख्या - ६२ ऋचासंख्या - ६१७
मंडल ४- सूक्तसंख्या - ५८ ऋचासंख्या - ५८९
मंडल ५- सूक्तसंख्या - ८७ ऋचासंख्या - ७२७
मंडल ६- सूक्तसंख्या - ७५ ऋचासंख्या - ७६५
मंडल ७- सूक्तसंख्या - १०४ ऋचासंख्या - ८४१
मंडल ८- सूक्तसंख्या - १०३ ऋचासंख्या - १७१६
मंडल ९- सूक्तसंख्या - ११४ ऋचासंख्या - ११०८
मंडल १०- सूक्तसंख्या - १९१ ऋचासंख्या - १७५४
-----------------------------------
ऋग्वेदातील सूक्तांमध्ये १-१६४ पर्यंत मंत्र असू शकतात.
------------------
मंत्रकर्ते ऋषी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, गंधर्व, राक्षस, ब्राह्मण स्त्रिया, क्षत्रिय राजकन्या असे होते/होत्या.
सर्व मंत्रकर्त्यांना ऋषी/ब्रह्मवादिनी असे संबोधिलेले आहे.
त्याकाळी प्रदीर्घ तपस्येने समाजातील कोणाही व्यक्तीला ऋषिपद मिळत असे.
ऋग्वेदात पक्षिणी, नागलोक, सर्पलोक, मत्स्य लोक, पणिलोक येथील मंत्रही आहेत.

मंडल १ सूक्तकर्ते ऋषी - शतर्चिन नावाचे १६ ऋषी
मंडल २ सूक्तकर्ते ऋषी - गृत्समद ऋषी
मंडल ३ सूक्तकर्ते ऋषी - विश्वामित्र ऋषीगण
मंडल ४ सूक्तकर्ते ऋषी - वामदेव गौतम ऋषीगण
मंडल ५ सूक्तकर्ते ऋषी - अत्रि ऋषीगण
मंडल ६ सूक्तकर्ते ऋषी - भरद्वाज ऋषीगण
मंडल ७ सूक्तकर्ते ऋषी - वसिष्ठ ऋषीगण
मंडल ८ सूक्तकर्ते ऋषी - काण्व ऋषीगण
मंडल ९ पवमानसोम विषयक सूक्तांचे एकत्रीकरण
मंडल १० विभिन्न ऋषींची विविध विषयांची सूक्ते ग्रथित केली आहेत.
-----------------------------
ऋग्वेदांतर्गत आलेले विषय -

- आध्यात्मिक तत्वज्ञानसूक्ते (अनादिअनंत परमेश्वराच्या विराट स्वरूपाचा वेध घेणारी)
- अनुभूतिजन्य साक्षात्कारवाद
- आचारधर्म
- दानमहात्म्य
- राजाची कर्तव्ये
- युध्दशास्त्र
- भूगोल
- पुनर्जन्म
- मधुविद्या (आत्मज्ञान)
- अनेकेश्वरवाद (देवतांमा प्रार्थना)
- मृत्यूत्तर गति
- योग
- भक्ति
- शांति
- राक्षस-पिशाचनाश
- दुःस्वप्ननाश
- प्रातःस्मरण
- रोगनाशन
- आरोग्यप्राप्ती
- शेतीचे फायदे
- जुगाराचे दुष्परिणाम
- अभिचारविद्या
---------------------------
विशुध्द स्वरूपाचे जतन -
स्वतंत्र लेखन व उच्चारणपध्दतीमुळे कोठेही पाठभेद किंवा उच्चारभेद आढळत नाही.

या ग्रंथातील भाषा आर्ष आहे. तिचा मूळ अर्थ कळणं अवघड आहे. तो समजण्यासाठी नऊ प्रकारचे ग्रंथ लिहिले गेले.
- शाकल संहिता (ऋषी, देवता व छंद यांचे एकत्रीकरण)
- ब्राह्मण (ऐतरेय व कौषीतकी), आरण्यक (ऐतरेय व सांख्यायन)
- पदपाठ
- क्रमपाठ
- शिक्षा (उदात्त, अनुदात्त आणि स्वरित आदि उच्चारशात्रांची माहिती
- कल्प (धर्मविधी)
- व्याकरण (पाणिनीप्रणित अष्टाध्यायी)
- ज्योतिष - लगधप्रणित वेदांग
- छंदशास्त्र - पिंगलप्रणीत छंदःशात्र
- निरुक्त - शब्दव्यत्पत्तिशास्त्र
ही सर्व १० सास्त्रे पाठ असणार्‍याला "दशग्रंथी" म्हणत असत.
---------------------------
ऋग्वेदातील देवता
सृष्टीचमत्काराशी संबंध नसलेल्या -
- अग्निमरुत्‌
- अग्नीषोम
- अन्न
- अपांनपात्‌
- अश्व
- इंद्राग्नी
- इंद्रापूषन्‌
- इंद्राबृहस्पती
- इंद्रामरुत्‌
- इंद्रावरुण
- इंद्राविष्णू
- इंद्रासोम
- कपिर्जल इंद्र
- गो
- दधिक्रावन्‌
- परमात्मन्‌
- पुरीष्य अग्नि
- प्रजापति
- बृहस्पति
- ब्रह्मणस्पति
- मंडूक
- मन्यु
- यूप
- रति
- रुद्र
- वरुण
- वास्तोप्पति
- विश्वेदेव
- विष्णु
- वैश्वानर अग्नि
- श्येन
- सरस्वती
- सोम
- सोमारुद्र
- सोमापूषन्‌
------------------------
सृष्टीचमत्काराशी संबंध असलेल्या -
- अग्नि
- अप्‌
- अश्विनीकुमार
- आदित्य
- इंद्र
- उषा
- ऋतु
- द्यावापृथ्वी
- पर्जन्य
- पूषन्‌
- मरुत्‌
- मित्रवरुण
- वायु
- सवितृ
- सूर्य

॥श्रीराम समर्थ॥