चार वेद

Tags:

चार वेद
-----------------
वेदवाङ्मयाचे ४ विभाग आहेत -
१) संहिता - यात देवांची स्तुति, प्रार्थना व वर्णने आहेत. हा छंदोबध्द मंत्रांचा समूह आहे
२) ब्राह्मण - यात संहितेतील मंत्रांचा अर्थ विशद केला आहे. हे गद्य ग्रंथ आहेत. यात विविध यज्ञप्रकार व त्यांची कृति दिलेली आहे.
३) आरण्यके - यात ब्रह्माचे मनन व निदिध्यासन आहे.

४) उपनिषदे - याला वेदांत म्हणतात. हे वेदांचे उत्तमांग आहे. यात विश्वरचनेचे चिंतन, ब्रह्मस्वरूपाचे संकल्पन, आत्मदर्शनाची साधना यांचा विकास व अर्थविस्तार आहे.
---------------------
द्वापरयुगात वेदव्यासांनी अनंतवेदराशीतील महत्वाचे वेदमंत्र निवडून त्यांचा समावेश संहितांमध्ये केला.
कलियुगातील अल्पमेधस्‌ (कमी बुध्दीच्या) पुरुषांकडून वेद नीट धारण केले जावेत हा त्या मागे हेतू होता.
या सुटसुटीत संहिता त्यांनी प्रवृत्ति लक्षणधर्म असलेल्या प्रमुख शिष्यांना दिल्या.

- ऋग्वेद पैल या शिष्यास
- यजुर्वेद वैशंपायन या शिष्यास
- सामवेद जैमिनी या शिष्यास
- अथर्ववेद सुमन्त या शिष्यास

संहितांचा अर्थ कळण्यासाठी पूर्वमीमांसा शास्त्राची सोय केली

वेदांमधला सिध्दधर्म निवृत्ति लक्षण असलेल्या शुकमुनींना शिकविण्यासाठी उत्तरमीमांसेचा उपदेश केला. त्याअंतर्गत असलेल्या सूत्रांना ब्रह्मसूत्रे म्हणतात.

॥श्रीराम समर्थ॥