भगवंत म्हणजे काय?

भगवंत म्हणजे काय?
परब्रह्म हा शब्द कळण्यासारखा नसल्यामुळे, उपासनेसाठी भगवंत हा शब्द सगुणत्वाचा बोध व्हावा यासाठी उपयोजिलेला आहे.

भगवान हा शब्द शुध्द, अचिंत्य अशा ऐश्वर्याने संपन्न व सर्वही कारणांचे कारण जे परब्रह्म त्याचा वाचक आहे.

- सर्वांचे पोषण व धारण करणारा असा अर्थ व्यक्त होतो
- ज्ञान, कर्म याचे फल देणारा, प्रलयकाळी कारणात कार्यात लय करणारा व सृष्टीकर्ता असा होतो
भग - संपूर्ण ऐश्वर्य, वीर्य, कीर्ति, लक्ष्मी, ज्ञान आणि वैराग्य या सहांस. या सर्वात्मकाचे ठायी सर्व भूत वास करतात व तोही सर्व प्रकारच्या सर्व भूतांत वास करतो.
- तो अविनाशी परमात्मा असा अर्थ आहे.
भगवान हा वासुदेव म्हणजेच परब्रह्माचा वाचक

॥श्रीराम समर्थ॥