स्वर्ग

स्वर्ग
हा त्रैलोक्याचा एक भाग आहे.
येथे देवदेवता निवास करतात.
यांचे स्वतंत्र लोक (स्थाने) आहेत.

अंतरिक्शाच्या बाहेर आणि सप्तलोकांच्या आत हा येतो.
नवग्रहांचे लोक यात येतात.
इंद्र हा स्वर्गाचा राजा मानला जातो.

medium_swarga1.jpg

यक्ष, किन्नर, विद्याधर, अप्सरा इ. नी हा भाग व्यापलेला आहे.
प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत. तशीच त्यांची कार्येही वेगळी आहेत.
अमृत पिऊन व पृथ्वीवरील मनुष्यांनी आहुतीद्वारा दिलेल्या भोजनाने पुष्ट होतात व त्या सत्कर्मी मनुष्यांना आशीर्वाद देतात.
पृथ्वीवरील मनुष्यांनी पुण्यकर्म त्यांच्या पापकर्माफेक्षा जास्त केले तर त्यांना स्वर्गात जागा मिळते.
तेथे ते स्वर्गातील भोग घेतात.
जोपर्यंत पुण्याचा साठा आहे तोपर्यंत ते त्यांना तिथे राहू दिले जाते. ते क्षीण झाल्यावर ते पुन्हा पृथ्वीवर दंवाद्वारे पडतात व त्यांचे जीवनचक्र चालू होते.
स्वर्गात राहणार्‍यांना मोक्ष नाही.
मोक्षासाठी त्यांना पृथ्वीवर मनुष्यरुपाने येऊन सद्‌गुरुनिर्दिष्ट साधना करुन त्यांची संपूर्ण कृपा प्राप्त करुन घ्यावी लागते. ते त्या जीवाला आत्मज्ञान देतात व त्याला माय़ेच्या कचाट्यातून व जन्म-मृत्यूच्या चक्रातून सोडवतात.
स्वर्गातील जींवांना जन्म-मृत्यूचे चक्र सुटत नाही.

॥श्रीराम समर्थ॥