अंतरिक्ष

अंतरिक्ष
हा पृथ्वीच्या बाहेर व लगत आणि स्वर्गाच्या आत असा सूक्ष्म त्रैलोक्याचा भाग आहे.
भुवः (अंतरिक्ष) -

medium_antariksha1.jpg

स्वामी - वायू
निवासी/रहिवासी - मरुत, रूद्र, अश्विनीकुमार, आदित्य, भू, विश्वेदेव, साध्यदेव, पितर
--------------------------------
याविषयी विविध ग्रंथांतून वाचून मला काय समजले?

- गीतेमध्ये १२ आदित्य, ४९ मरुत्‌, ११ रुद्र, २ अश्विनीकुमार यांचा उल्लेख मी अनेकवेळा वाचला आहे.
- तसेच पितरांविषयीचा उल्लेख गीतेमध्ये, वेदांतून, उपनिषदांतून, सर्व पुराणांतून, संतांच्या लेखनातून मी वाचला आहे.
- प्रलयामध्ये यांच्या शक्ती प्रचंड प्रमाणात कार्यान्वित केल्या जातात व प्रलय घडून येतो. प्रथम १२ आदित्य पृथ्वीला भाजून काढतात. नंतर ११ रुद्र अतिवृष्टि करतात, नंतर ४९ मरुत्‌ पृथ्वीला सुकवतात इ.
- पितरांविषयीचा उल्लेख तर खूपच महत्वाचा आहे. माणसाच्या अनेक कर्तव्यांपैकी त्याने आपल्या पितरांच्या चांगल्या गतिसाठी श्राध्द करणे व वायुरुपाने अन्न पुरवून त्यांना पुष्ट-संतुष्ट करणे हे आहे. ते सध्याच्या कालात शहरांतून व उच्चशिक्षित समाजाकडून फार मागे पडले आहे.

हे सर्व सूक्ष्म परंतु अतिशय प्रभावी व शक्तिशाली शक्तिसमुच्चय आहेत.
त्यांचे अस्तित्व दिसले नाही तरी ते असते व श्रध्दावंताला मान्य असते.

॥श्रीराम समर्थ॥