भगवंत आणि सामान्य माणूस

भगवंत आणि सामान्य माणूस-
(संदर्भ - ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकरमहाराज चरित्र)
---------------
देव आहे असे खर्‍या अर्थाने समजून वागणारे फार थोडे असतात.
प्रत्येक जीवाला भगवंताची गरज असल्याने त्याच्याशिवाय त्याला चैन पडत नाही.

आपण जे बोलतो, चालतो, पाहातो ते सर्व भगवंताच्या अधीन आहे अशी जाणीव सर्वसामान्य माणसाला नसते.
सामान्यांमध्ये असणारी तळमळ ही पूर्णत्त्वाची म्हणजेच भगवंताची असते. नास्तिकाचासुद्धा पूर्णत्त्वाकडे ओढा असतो.
सर्वसामान्य माणसांची बुद्धी अगदी लवचिक असते.
त्याच्या वृत्तीवर कशाचाही परिणाम होतो.
तो भोग आणि दु:ख यात वेळ घालवतो.
आपले खरे सुख-दु:ख भगवंताच्या संयोग-वियोगामध्ये असते.
माणसाचे मूळ स्वरूप भगवंताचे असल्याने त्याला भगवंताची स्वाभाविक आवड असते. पण आपल्याला भगवंताची विस्मृती झाल्यामुळे ही आवडही बाजूला पडलेली असते.
विद्वानाची विद्वत्ता त्याच्या मनात अभिमान उत्पन्न करते. ती भगवंताच्या निष्ठेला मनामध्ये थारा देत नाही.
आपल्यामध्येही देवाचा अंश आहे पण आपण तो झाकून, विझवून टकतो.
आपल्याकडे असलेली विद्या, पैसा आणि प्रकृती ही भगवंताने दिलेली आहे, याचा आपल्याला विसर पडतो.
जगातले पाश आपल्याला बंधनात पाडतात.
भगवंताचा पाश या बंधनांपासून आपल्याला मुक्त करतो.
आपल्यावर आलेली संकटे ही आपल्याच कर्माची फळे असतात.
सामान्य माणूस साधनांना घट्ट धरून ठेवतो. परमेश्वर प्राप्ती हे त्याचे साध्य बाजूला पडते.
भगवंताच्या प्रेमाचा रंग पांढरा आहे.
सामान्य माणूस आनंदासाठी न जगता वस्तूंसाठी जगतो.

॥श्रीराम समर्थ॥