विविध शाप

शाप आहे हे कसे कळते? -
जन्मकुंडलीमध्ये विशिष्ट प्रकारचे ग्रहयोग असले तर ती कुंडली शापित आहे हे कळते.
---------------
बृह्त्‌पाराशरी या ग्रंथात एकूण आठ शाप सांगितले आहेत

  • सर्पशाप,
  • पितृशाप,
  • मातृशाप,
  • भ्रातृशाप,
  • मातुलशाप,
  • ब्रह्मशाप,
  • पत्नीशाप,
  • प्रेतशाप.

हे दोष वंशपरंपरागत असतात. काही शाप ठराविक पिढ्यांपर्यंत असतात, जसे की दोन पिढ्या, तीन पिढ्या, सात पिढ्यांपर्यंत वंशजांना भोगावे लागतात.

पितृपीडेची लक्षणे पाहाता कलियुगात बहुतांशी घरांमध्ये त्यापैकी कोणती ना कोणती लक्षणे दिसून येतात. त्यामुळे बहुतेकांना काम्य श्राद्धे करण्यास ज्योतिषांकडून सांगितले जातात. पण काम्य श्राद्धविधीमध्ये एका वेळी एकाच आत्म्याला सद्‌गती मिळण्याची शक्यता असते. एकदा काम्य श्राद्धविधी करूनही पीडा चालूच राहीली तर पीडा नाहीशी होईपर्यंत काम्य श्राद्धे करावी लागतात.

॥श्रीराम समर्थ॥