पितृलोकातील कालगणना

माणसाचा एक महिना (३० दिवस) हा पितरांची एक अहोरात्र असते.

कृष्ण पक्षातील अष्टमी ते शुक्ल पक्षातील अष्टमी हा पितरांचा दिवस अहः (१२ तास) व

शुक्ल अष्टमी ते कृष्ण अष्टमी ही पितरांची रात्र. (१२ तास)

अमावास्येच्या दिवसाच्या मधल्या भागामध्ये (माध्याह्नी १२ ते दुपारी ४ या काळात) पितरांची जेवण्याची वेळ असते. म्हणून अमावास्येलाही काही जण श्राद्ध करतात.

आपण रोज जेवतो तसे दर अमावास्येला श्राद्ध केल्याने पितरांना रोज अन्न मिळते.

‘अमावास्या’ ही पितरांची तिथी असते.

(संदर्भ – ऋग्वेद, १० वे मंडल, चौदा ते सोळा सूक्ते)

॥श्रीराम समर्थ॥