नैमित्तिक श्राध्दे

नैमित्तिक श्राध्दे -
और्ध्वदेहिक हे मृताचे श्राद्ध आहे.
एकोद्दिष्ट श्राद्ध
एकालाच उद्देशून एकपिंडाने युक्त असे श्राद्ध. मृत व्यक्तीसाठी पहिल्या वर्षातील सर्व श्राद्ध येतात.

नांदी श्राद्ध
हे श्राद्ध सकाळी (माध्याह्नी १२ च्या आधी) करतात. पुत्रजन्म, उपनयन (मुंज), विवाह यासारख्या संस्कारांच्या वेळी, तसेच विविध प्रकारच्या यज्ञकर्मे - गृहप्रवेश, वयोवस्थ शांती वयाच्या पन्नासाव्या वर्षांपासून शंभर वर्ष वयापर्यंत दर पाच वर्षांनी करण्याची शांती) - करतानाही नांदी श्राद्ध केले जाते.

सपिंड श्राद्ध
या श्राद्धामुळे मृतजीवांना ‘प्रेत’ संज्ञेतून, ‘पितृ’ संज्ञा प्राप्त होते.

तीर्थ श्राद्धे -
काशी येथे गंगाकिनारी,

प्रयाग येथे त्रिवेणीसंगमाजवळ,

पितृगया येथे विष्णूपद मंदिराजवळ,


मातृगया (सिद्धपूर, गुजरात) येथे बिंदूसरोवराजवळ,

रामेश्वर येथे समुद्रकिनारी,

कन्याकुमारी येथे तीन समुद्रांच्या संगमापाशी,

श्रीबद्रीनाथ क्षेत्रामध्ये

पितरांसाठी ‘तीर्थ श्राद्धे’ करता येतात.
पितृगयेला व मातृगयेला पितरांच्या सद्‌गतीसाठी श्राद्ध करता येते.

॥श्रीराम समर्थ॥