सद्गुरु/संत/सत्पुरुष

सद्गुरु संतत्व
-------------------------------------------------
अनेक संतांची चरित्रे अभ्यासल्यानंतर मला साक्षेपाने जे सर्वांना समान असे असे जाणवले ते देत आहे.
-----------------------------------
दोन प्रकारचं बाह्य जगणं -
 ब्रह्मचर्य, अवलियापण, सडेफ़टिंग
 प्रापंचिक गृहस्थधर्माचे पालन करणारे
-----------------------------
व्यक्तिमत्वाची वैशिष्ठ्ये -
विलक्षण तेज, शांती, समाधान, आनंद, स्थैर्य, धैर्य, त्रिकालज्ञत्त्व, करूणा, स्वत:ची सततची उपासना, सगुण रूपावरची अपरिमित भक्ती, शास्त्रविहित कर्मे, निर्वासन, निरहंकारी व्यक्तिमत्त्व, अखंड आत्मतृप्ती, सर्व सिद्धी पायाशी, लोकांचं दु:ख दूर करून भगवंताच्या उपासनेसाठी त्यांना कटिबद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, सर्व भेदांच्या पलिकडे, सर्वात्मभाव, सर्वांभूती परमेश्वर पाहाण्याची दृष्टी
------------------------------------------
जीवन जगणे हा लीलाविग्रह
माणसासारखे दिसणे, वागणे , परंतु आंतरिक स्थिती न कळण्यासारखी, सर्वसामान्य लोकांचा गोंधळ
------------------------------------------
संतत्त्वाचे अविष्कार पाहून वाढती लोकप्रियता, मानसन्मान, वैभव

लोकांनी घेतलेल्या अघोरी कसोट्या
-
मारेकरी घालणं, विषप्रयोग, अपमान करणं, दुखापत करणं, लुटणं, साधकांना भडकावणं, त्यांची श्रद्धा डळमळीत करणं, आरोप करणं, आव्हान देणं, अघोरी प्रयोग करणं.
-------------------------------------
देह ठेवणे -
देह ठेवताना या सर्वांतून पार होणं ही सद्‌गुरुंची कृपा.

देहपाताचे स्थान, वेळ, घटिका, कारण याची आधीच तयारी, त्याप्रमाणे संदिग्ध / निसंदिग्ध सूचना

देहपातानंतर देहाचे काय करायचे?
समाधीस्थान, उरलेले कार्य कोण, कसे चालविणार याची ठोस योजना आधीच तयार, त्याप्रमाणे माणसे पारखून तयार केलेली.

अमृतघटिकेला अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत देहत्याग, ब्रह्मरंध्रातून प्राण बाहेर पडणं, उत्तराभिमुख, शेवटपर्यंत मुखात भगवंताचे नाम, संपूर्ण जागेपणी देह सोडणं, मृत्यूनंतर देहावर अवकळा नाही, विलक्षण तेज, आनंद, समाधान.
--------------------------------------------------------
देहपातानंतर

देह ठेवल्यानंतर भक्तभाविकांना आपल्या सूक्ष्म आस्तित्वाची प्रचीति देणं, मार्गदर्शन करणं, दिलासा देणं. अनुग्रह दिलेल्या प्रत्येकाला मोक्ष मिळेपर्यंत त्याची जन्मानुजन्म सोबत करणं, त्याची जबाबदारी स्वीकारणं.

अवतारकार्याच्या स्थानाची खूप प्रसिद्धी होणं, भाविकांची श्रद्धा वाढत जाणं, स्थान वैभवशाली होणं, सतत अन्नदान होणं, प्रचंड संख्येनं उपासना होणं, वर्षभर कर्यक्रमांची रेलचेल, पुस्तक-चरित्र निर्मिती, निवासव्यवस्था, आजीव सेवाव्रती

॥श्रीराम समर्थ॥