नामस्मरण सतत केल्याचे फळ

नामस्मरण सतत केल्याचे फळ -

नामें संकटे नासती । नामें विघ्नें निवारती ।
नामस्मरणे पाविजेती । उत्तम पदे ॥
भूत पिशाच्च नाना छंद । ब्रह्मगिह्रो (ब्रह्मराक्षस) ब्राह्मणसमंध ।
मंत्रचळ नाना खेद । नामनिष्ठे नासती ॥
नामें विषबाधा हरती । नामें चेडे चेटके नासती ।
नामें होय उत्तम गती । अंतकाळी ॥
परमेश्वराची अनंत नामें । स्मरिता तरिजे नित्य नेमे ॥
नामस्मरण करता येमे । बाधिजेना ॥
सहस्र नामामधे कोणी येक । म्हणता होतसे सार्थक ।
नाम स्मरता पुण्यश्लोक । होईजे स्वयें ॥
काहींच न करूनि प्राणी । रामनाम जपे वाणी ।
तेणें संतुष्ट चक्रपाणी । भक्तांलागी सांभाळी ॥
महा दोषांचे गिरिवर । रामनामें नासती ।
म्हणौनि नाम अखंड स्मरावें । रूप मनीं आठवावें ॥
नामस्मरणे पावावे ।समाधान ॥

॥श्रीराम समर्थ॥