नामाचे माहात्म्य

नामाचे माहात्म्य -

नामाचा महिमा जाणे शंकर । जना उपदेशी विश्वेश्वर ॥
वाराणसी मुक्तिक्षेत्र । रामनामेकरुनी ॥
उफराट्या नामासाठी । वाल्मिक तरला उठाउठी ।
भविष्य वदला शतकोटी । चरित्र रघुनाथाचे ॥
हरिनामें प्रह्लाद तरला । नाना आघातांपासून सुटला ।
नारायेणनामें पावन झाला । अजामेळ ॥
नामें पाषाण तरले । असंख्यात भक्त उध्दरले ।
महा पापी तेचि झाले। परम पवित्र ॥
अगाध महिमा न वच वदला । नामें बहुत जन उध्दरला ।
हळाहळापासून सुटला । प्रत्यक्ष चंद्रमौळी ॥
चहू वर्णां नामाधिकार । नामी नाही लहानथोर ।
जड मूढ पैलपार । पावती नामें ॥

॥श्रीराम समर्थ॥