मुमुक्षू

मुमुक्षू -

- हा माणूस जन्म-मृत्यू-रोग-व्यथा-सुख-दुःख या दैनंदिन वास्तवाकडे इतरांपेक्षा वेगळ्या नजरेनं पाहतो.
- सगळं काही जर आपल्या मनाप्रमाणे घडत नाही हे त्याच्या लक्षात येतं.

- सर्व मानवी संबंध स्वार्थापोटी असतात हे त्याला कळून चुकतं.
- हे जग एका विशिष्ठ पध्दतीनं (जन्म-मृत्यू चक्राकार) चाललेलं तो पहातो.
- आपल्याला न दिसणारी एखादी सूक्ष्म पण प्रभावी शक्ती असावी व तिच्या अधिपत्याखाली जगाचे सर्व व्यवहार होत असावेत असं त्याला वाटतं.
- त्याच्या असं लक्षात येतं की सुख आणि दुःख जोडीनं एकापाठोपाठ येतात.
- ग्रंथवाचनानं, संतसंगतीनं त्याला असं समजतं की मनुष्यजन्म मोठ्या मुष्किलीनं येतो.
- परमात्माप्राप्ती हेच या जन्माचं ध्येय अपेक्षित आहे. आसपासची बहुतांशी माणसं सुखासाठी धडपडताना तो पहातो.
- परमात्म्याच्या प्राप्तीकरता कोणी प्रयत्न करताना दिसत नाही.
- परमात्मा आपल्याच ह्रदयात भेटल्यानं जन्म-मृत्यूच्या चक्रातून सुटता येतं असं त्याला समजतं.
- या चक्रातून कायमचं मोकळं व्हावं म्हणजेच मुक्ती मिळवावी ही त्याची इच्छा प्रबळ होऊ लागते.
- त्यासाठी तो सुचेल तशी साधन...जपजाप्य, तीर्थयात्रा, होमहवन, पूजाअर्चा, ग्रंथवाचन इ. करु लागतो.
- मोक्षाची इच्छा (मुमूक्षा) ही त्याच्या अनुसंधानाचा विषय होते.

॥श्रीराम समर्थ॥