चातुर्वर्ण

चातुर्वर्ण-
चातुर्वर्णांची निर्मिती साक्षात्‌ परमात्म्याने केली आहे. ही निर्मिती मी माणसाच्या स्वभावप्रभावामुळे दिसणारे गुण आणि कर्म यांच्या विभागानुसार केली आहे असे भगवंत सांगतात.
(संदर्भ - श्रीमद्भगवद्गीता अध्याय १८ श्लोक - ४१)
ब्राह्मणाचे स्वभावगुण - शांति, दम, तप, शौच, क्षांति, आर्जव
नियत कर्म - ज्ञान, विज्ञान, आस्तिकता, ब्रह्मकर्म (श्लोक - ४२)
---------------------------------------
क्षत्रियाचे स्वभावगुण - शौर्य, तेज, धृति, दक्षता, युध्दातून पलायन न करणे
नियत कर्म - दान देणे, ईश्वरभाव, युध्द करणे (श्लोक - ४३)
----------------------------------------
वैश्याचे स्वभावगुणकर्म - शेती करणे, गाईंचे पालन करणे, वाणिज्य (श्लोक - ४४)
---------------------------------------
शूद्राचे स्वभावगुणकर्म - परिचर्या (सेवा) (श्लोक - ४४)
------------------------------------------------------------
येथे कोठेही जन्मानुसार कर्म असे म्हणलेले नाही.
वर्ण आणि जात यामध्ये कलियुगातील माणसांचा गोंधळ झालेला दिसतो.

॥श्रीराम समर्थ॥