अहिल्याबाई होळकर

काशी-मथुरा-गया-सोमनाथ-नर्मदाकाठ-अयोध्या इ. हिंदूच्या पवित्र तीर्थांच्या ठिकाणचे मुख्य मंदिर व त्यातील मूर्ती मुस्लिम राजवटीत भ्रष्ट झाल्यावर, अहिल्याबाई यांनी ही सर्व प्रमुख देवळे नवीन बांधवली, त्यावर सुवर्णकळस चढवला, नवीन मूर्ती तयार करवून किंवा जुनी मूर्ती सापडवून तिची डागडुजी करवून त्या मूर्तींची यथासांग पूजा सुरु केली. मी यात्रांना गेल्यावर ही देवळे स्वतः पाहिली तेव्हा मला अहिल्याबाईंच्या कार्याचे खरे महत्व कळले. विशेषतः हिमालयातील देवळे (केदारनाथ, बद्रीनाथ) इ. पुनर्जिवित करणे चेष्टा नाही. त्या काळामध्ये एका स्त्रीने एवढे काम केले, जे आजच्या काळात कोणालाही सर्व सुविधा उपलब्ध असूनही करणे शक्य नाही, असे मला वाटते. परमेश्वरी इच्छा व शक्ती पाठीशी असल्याशिवाय़ हे शक्य नाही. माझ्या मनात लहानपणी शाळेत त्यांचे चरित्र वाचून त्यांच्याविषयी आदर होताच. तो आदर प्रत्यक्ष ही उभी देवळे पाहून द्विगुणित झाला. (शेजारी पोलिस/आर्मी बंदोबस्तातील जुनी सरकारी निर्णयाविना दुर्लक्षित देवळे पाहून संताप आला).