सगुण पूजेचे महत्व (E-Book)

सगुण पूजेचे महत्व (E-Book)जो पर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत भगवंताच्या सगुण रुपाची अर्चना व निर्गुणाविषयीचे वाचन, चिंतन व मनन करावे. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर सुध्दा सगुण रुपाची अर्चना चालू ठेवावी, असे श्रीगोंदवलेकरमहाराजांनी सांगितले आहे.

कलियुगाच्या सध्याच्या स्थितीमध्ये काही मोजकी घराणी सोडली तर कुल, कुलदेवता, कुलाचार, कुलधर्म इ गोष्टींची हेटाळणीच होते. विशेषतः शहरी उच्चशिक्षित घरांतून याविषयी पूर्ण अज्ञानच असते. कधीतरी दैवाचा जोरात फटका बसला की सगुण उपासना महत्वाची असते, हे त्यातल्या त्यात देवभीरू माणसांच्या लक्षात येते. बहुतांशी घरांतून कुलाचार न समजून घेता रुढी म्हणून केले जातात. नंतर ते सोडूनही दिले जातात. गीतेमध्ये अर्जुनाने, भगवान श्रीकृष्णाने व संतांनी कुलधर्माचे महत्व सांगितले आहे. ते नीट समजून श्रध्देने निष्काम भावाने केले तर मनाला वेगळीच शांति मिळते हे निश्चित.
This e-book is for sell. To purchase it please click on
http://www.bookganga.com/eBooks/Book/5462213106836453731.htm
Price - Rs. 190/-