सद्‌गुरुकृपा (E-Book)

सद्‌गुरुकृपा

मी कित्येको जन्म विविध योनींमधून फिरत होते, तेव्हा संसाराच्या मोहजालात अडकलेली होते. मीच "मी-मला-माझे", हवे/नको या अनंत इच्छा-आकांक्षा-हव्यास यात गुंतवून घेतले होते. माणसे-वस्तू यांच्या मोहाने मी फरफटली जात होते. तात्पुरती-ओढ याने मी हो-नाहीच्या द्वंव्दात अडकलेली होते. आशा-निराशा, चिंता, सुख-दुःख यानं मला घेरलं होतं.

सन २००४ मध्ये मी भक्तिमार्गाचा अवलंब करण्याचे ठरवले पुढचं काही दिसत नव्हतं कारण मार्ग नवीन, चुकेल की काय ही भीती, घरात सांगायला कोणी नाही. सासर-माहेरून या नव्या खुळाला विरोध. का कुणास ठाउक पण मला वनवासातला रामप्रभू आपल्याबरोबर चालतोय असं वाटायला लागलं. मी करतेय हे योग्य करतेय असं सूचित करणार्‍या घटना घडत होत्या. माझी कसोटी पहाणारे प्रसंगही घडत होते. मला असं वाटायला लागलं की हा मार्ग साधु-संतांचा-ऋषी-मुनींचा-साधकांचा आहे. हा कठीण तर आहेच, पण मी एकटी नाही. माझ्या मागेपुढे खूपजण आहेत. हा मार्ग आपल्य़ा भारतीय सनातन धर्माचा आहे. तो अदृश्य आहे पण योग्य आहे. आपण फक्त सांगितलेल्या मार्गाने चालत रहावं.
२००६ मध्ये गोंदवल्यात क्षेत्रगुरुजींनी महाराजांच्या पादुकांवर मला यथाविधी दीक्षा दिली. माझ्या मस्तकावर शाल घातली गेल्यावर पादुका व मी यात संवाद सुरु झाला. महाराजांनी मला स्वीकारलं असल्याचं मला जाणवलं. समाधीकडे पाहिलं आणि म्हणलं," आता तुम्हीच माझे सर्व काही. आई-बाप-भाऊ-हितचिंतक.. मला आता जगात दुसरं कुठलं नातं उरलं नाही. तुम्हाला मी शरण आहे. मला पदरात घ्यावं माझ्यावर कृपा करावी. माझ्या अपराधांची क्षमा करावी"
मी त्या क्षणापासून मागची प्रतिभा/ऋजुता राहिले नाही. मी आता फक्त महाराजांची एवढंच मला नातं राहिलं. मागचे पाश तुटल्यासारखे वाटले. माझा पुनर्जन्म झाला.
This e-book is for sell. To purchase it please click on
http://www.bookganga.com/eBooks/Book/4766729172881506303.htm?Book=Sadgur...
Price - Rs.40/-