पिंड जिज्ञासा (E-Book)

पिंड जिज्ञासा

इच्छांचा जन्म आपल्या नियंत्रणाखाली नाही, इच्छांचं स्वरूप आणि गुणधर्म आपल्या हातात नाही, इच्छा पूर्ण व्हाव्यात ह्यासाठी करावे लागणारे प्रयत्न एका मर्यादेपर्यंत आपल्या हातात असतात, इच्छांचं पूर्ण होणं आपल्या हातात नसतं. म्हणजे याचा अर्थ असा की माझ्या मर्यादित गुणवत्तेप्रमाणे माझे मर्यादित प्रयत्न एवढंच माझ्या हाती असावं की काय? बाकी काहीच माझ्या नियंत्रणाखाली नाही!

माझा जन्म, माझा विकास, माझा मृत्यू, मृत्यूनंतरची माझी गती, माझ्या मनोविश्वात स्थान असलेल्या सर्व माणसांची जन्ममृत्यूगती, निसर्गातल्या सर्व सजीवांचं जन्ममृत्यूचक्र, सजीव आणि निर्जीव ह्यांच्यामधील साखळी, पृथ्वीबाहेरचं अफ़ाट, असीम विश्व – ह्यांना नियंत्रित करणारं काहीतरी असलंच पाहिजे राव!
कशासाठी ही निर्मिती? जे काही हे सगळं नियंत्रित करतंय त्यानं हा उपद्‌व्याप मांडला कशाला? ह्या सगळ्या घडामोडींच्यामागचा त्याचा हेतू काय असावा? तो दिसत नाही पण तो असला पाहिजे, तो असला तर मला जाणवायला पाहिजे. कधीतरी जाणवून तो जो गुप्त होतो, त्याला पकडायचा कसा? प्रत्येक कणाची हालचाल जर त्याच्या इच्छेने होतेय तर त्याचं अस्तित्त्व मला सतत का जाणवू नये? ह्या चिंतनापोटी मी परमार्थाकडे शिरले.

This e-book is for sell. To purchase it please click on http://www.bookganga.com/eBooks/Book/5425896527828262510.htm?Book=Pind-J...
Price - Rs. 25/-