मी केलेल्या ज्योतिर्लिंगाच्या यात्रा

मी केलेल्या ज्योतिर्लिंगाच्या यात्रा -

१) २००६ पूर्वी श्रीभीमाशंकरदर्शन तीन वेळा (१९९५ निसर्गसहल, १९९३ कौटुंबिक सहल, १९७९ इंटर्नशीप करताना)
२) २००६ एप्रिल - श्रीकेदारनाथ यात्रा
३) २००६ डिसेंबर - श्रीरामेश्वरम्‌ यात्रा
४) २००७ जानेवारी, २००८ मार्च - श्रीपरळी वैजनाथ यात्रा(दोन वेळा),
५) २००७ जानेवारी, २०१० ऑगस्ट श्री औंढ्या नागनाथ यात्रा
६) २००७ एप्रिल व १९९७ मे - काशी श्रीविश्वेश यात्रा
७) २००७ नोव्हेंबर - श्रीसोमनाथ यात्रा
८) २००७ डिसेंबर - श्रीत्र्यंबकेश्वर (आधी दर्शन १९८३, नंतर नारायणबलि व नागबलि विधीनिमित्ताने २००७, रुद्राभिषेक - २००९ ऑक्टोबर)
९)व १०) २००८ ऑगस्ट - श्रीओंकारनाथ व श्री ममलेश्वर व श्रीमहाकालेश्वर यात्रा
११) २०१० जानेवारी - श्रीमल्लिकार्जुन यात्रा
१२) २०१० ऑक्टोबर, १९९७ डिसेंबर (दोन वेळा) - श्रीघृष्णेश्वर यात्रा

मी असं पाहिलं आहे की सर्व १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण होणारे यात्रेकरु कमी असतात. कोणते तरी एक स्थान रहातेच.
श्रीशिवशंकराची मी अगदी लहानपणापासून भक्त असल्याने व आमच्या परसातील शिवशंकराची कृपा झाल्याने व विशेष म्हणजे श्रीसद्‌गुरुंची कृपा असल्यानेच हे शक्य झाले असावे.

॥श्रीराम समर्थ॥