ऋषींविषयी विस्ताराने

ऋषींविषयी विस्ताराने

संत - हे ब्रह्मवान्‌ असतात. ब्रह्माशी त्यांचे अत्यंत सायुज्य असते.
जितात्मा - कोणत्याही कारणाने जे रागावीत नाहीत वा हर्षित होत नाहीत.
साधु - हे गुरुचे हित करणारे, ब्रह्मचर्य असणारे, व्रतपरायण असणारे व, साधनेमध्ये तन्मय असणारे असतात.
वैखानस साधू - घोर जंगलात हे साधनेत निमग्न असणारे असतात.
आचार्य - हे वृध्द, लोभहीन, आत्मनिष्ठ, दम्भरहित, विपुल विद्यावान, विनम्र व सरळ व्यवहार करणारे असतात.
हे सर्व नियमांचे पालन करणारे असतात. ते संयमाने राहून सर्व धर्मकार्यांचे अनुष्ठान करतात. लोकांना मर्यादेचे पालन करायला लावतात. शात्रांचा अर्थ लावतात.
----------------------------
शिष्ट -
दान, सत्य, तपस्या, लोभनिवृत्ति, विद्याध्ययन, यज्ञाराधन, संतानोत्पत्ति (सृष्टीची निर्मिति)व दया यांना शिष्टाचार म्हणतात. आणि असे शिष्टाचार करणार्‍यांना शिष्ट म्हणतात.
मनु, सप्तर्षि हे शिष्ट असतात.
हे मनुष्ययोनीत जन्म घेतल्यानंतर शिष्टव्यवहार करतात.
--------------------
ऋषी -

ऋष्‌ -
गमन
मोक्ष-प्राप्ति
ज्ञान
श्रुति
सत्य
तपस्या
परब्रह्माशी एकरुप
ॠषी - वरीलप्रमाणे आचरण असणारे, सर्व चराचर जीवांमध्ये परमतत्वाचे दर्शन होणारे
परमऋषी - सांसरिक विषयांतून निवृत्त होऊन अव्यक्त परम तत्वात निवास करणारे
महर्षि - परम बुध्दिवान, धैर्यशाली, महान
सप्तर्षि - सत्याचे परम पुजारी, महातेजस्वी, पंचतन्मात्रांमध्ये रहाणारे
श्रुतर्षी - यांचे पुत्र/शिष्य यांच्या नावाने ओळखले जातात व श्रुतिशास्त्रतत्वांवर ज्यांचा विशेष अधिकार असतो.
-------------------
ब्रह्मदेवाचे मानसपुत्र - महर्षि

भृगु
मरीचि
अत्रि
अंगिरा
पुलह
क्रतु
मनु
दक्ष
वसिष्ठ
पुलस्त्य
------------------
ब्रह्मक्षेत्राचे निवासी -

वसिष्ठ, शक्ति, पराशर, इंद्रप्रमति, भरद्वसु, मैत्रावरुण, कुण्डिन

॥श्रीराम समर्थ॥