बालकांड

बालकांड

- श्रावणाने मरताना रामनाम घेतल्याने तो मुक्त झाला.
- श्रावणाच्या आईवडिलांनी शाप दशरथराजाला दिला तेव्हा त्याला वाईट वाटण्याऐवजी आनंद झाला की मला पुत्र होणार.
- ब्रह्महत्येच्या (श्रावणाच्या वधाच्या) पापातून मुक्त होण्यासाठी दशरथाने अश्वमेध यज्ञ केला पण त्याच्या देशाला अवर्षण सोसावे लागले.
- श्रीवसिष्ठ ऋषींनी पाय़साचे तीन भाग केले
१) धर्मपत्नी - कौसल्या जिच्या पोटी परब्रह्म येणार होते
२) साध्वी - सुमित्रा जिच्या पोटी भजनोत्तम लक्ष्मण येणार होता
३) सुंदर- कैकेयी जिच्या पोटी परमधर्म भरत येणार होता.

कैकेयीला श्रीवसिष्ठांचा राग आला. तिने पायस घ्याय़ला विलंब केला.

- अयोध्येचे महत्व काशीपेक्षा जास्त आहे. तेथे राज्य करणार्‍या तीन राजांनी (रुक्मांगद, शिबी व श्रीराम) आपली नगरी वैकुंठाला नेली (सर्व जीवांना मुक्त केले).
- शापित अप्सरा जी घार तिने कैकेयी क्रोधायमान पाहून तिचा पाय़स पळवला.

कैकेयी रडवेली झाली. तिला केलेला उपदेश - गुरुवचन न मानणे याची शिक्षा होते, गर्व आड येतो, निजस्वार्थामुळे अतिघात होतो, विषयामुळे अधःपतन होते.
कौसल्येने केलेले सान्त्वन - जो परदुःखामुळे सुखी होतो तो ब्रह्मराक्षस होतो.
कौसल्या व सुमित्रेने आपल्यामधले अर्धे भाग कैकेयीला दिले.
ते कैकेयीला गिळताना त्रास झाला तेव्हा श्रीवसिष्ठांनी तिला मंत्रोदक दिले.
सत्संगमहिमा - सत्संगती असते तेव्हा दुःख होत नाही, अधोगती मिळत नाही, शिवाय जिवाचा उद्धार होतो.
-------------------------
शिवरामायण -
अगस्ती व स्कंद (कार्तिकेय) संवाद -
- सदाशिव स्वतः वक्ता
- पार्वती श्रोता
श्रीएकनाथमहाराज सांगतात -
- श्रीरामाने स्वप्नात येऊन स्वतः कथा सांगितली. मी ती जागेपणी लिहीली. हा ग्रंथ ही श्रीरामाची सत्ता आहे. येथे मी रामायण लिहिले या वाक्याला काही अर्थ नाही. मी जर झोपलो तर श्रीराम स्वतः येऊन मला थोपटून उठवतात व रामायण लिही असे म्हणतात. ग्रंथ व श्रीराम दोन्ही ब्रह्ममूर्ती आहेत. जो कोणी निंदेल वा वंदेल ते त्या दोघांना जाईल मला नाही. माझ्या हातून ही ग्रंथनिर्मिती करवून घेणं ही श्रीजनार्दनस्वामींची युक्ती आहे.ते एकांतात निजगुह्यार्थ ऐकवतात.
निंदक व वंदकांविषयी महाराज म्हणतात -
हे दोन्ही माझी माऊली आहेत.
निंदकांमुळे माझा कलिमल जातो.
निंदक हे माझे परमार्थामधले सहाय्यक आहेत.
निंदा म्हणजे परमामृत आहे.
निंदक निजस्वार्थ पाहत नाही, तो अतिसमर्थ परोपकारी असतो.
जो निंदा निर्द्वंद्वपणे सोसतो त्याची आई धन्य आहे.

॥श्रीराम समर्थ॥