महाराजांच्या प्रवचनांतील आनंद व समाधान

जगापाशी समाधान नाही, महाराजांपाशी ते आहे. समाधान कशात आणि कुठे आहे याचा त्यांनी शोध लावला. ते समाधानरूप आहेत. ज्यांच्या घरात समाधान असते, तिथे ते असतात. जो त्यांचा शिष्य समाधानी नाही तिथे रहायला त्यांना कष्ट होतात. ते अत्यंत समाधानी आहेत. अशा आनंदमय व समाधानी महाराजांनी आपल्याला समाधानाचा मार्ग दाखवला आहे.