महाराजांच्या प्रवचनांतील संत-सत्पुरुष

संतांना सत्याचे ज्ञान झालेले असते, ते सर्वज्ञ असतात. ते सत्याला धरून राहतात. ते सर्वसामान्य माणसाला मार्ग दाखवायला तयार असतात. ते "राम कर्ता" या भावनेने प्रचंड कर्म करतात. जे दिसतही नाही. ते साक्षित्वाने राहून जगापासून अलिप्त राहतात. कर्म करूनही ते अलिप्त असतात. त्यांचे अंतःकरण शुध्द असते. त्यांची शिव्यांची भाषाही न बोचणारी किंवा आशीर्वादरूप असते. संत विद्वान नसतात. देह सोडल्यावरही त्यांचे अस्तित्व लोकांना जाणवते. संत हे आईसारखे असतात. ते आपल्याला भगवंताची आठवण करून देण्याचे काम करतात. सर्व संतांचे जगावर उपकार आहेत. त्यांनी भगवंताला सगुणात आणले. भगवंत त्यांनी आपल्याला सुसेव्य केला. परमात्म्याला आपलासा करून घ्यायला नामस्मरण हे सोपे साधन दिले. सोपे सद्‌ग्रंथ निर्माण केले. यथाशक्ती अन्नदान करणे हेच कलियुगात उत्तम साधन आहे असे सांगितले.