श्रीयोगवाशिष्ठ

श्रीयोगवाशिष्ठ

--------------
संदर्भ - श्रीयोगवासिष्ठ - संपादक - डॉ. म.वि.गोखले. यशवंत प्रकाशन
-----------
या ग्रंथाची पर्यायी नावे
- आर्षरामायण
- उत्तररामायण
- वासिष्ठमहारामायण
- मोक्षोपायसंहिता
- बृहद्योगवासिष्ठ

---------------------
एकूण श्लोकसंख्या - ३२०००
---------------------
प्रकरणे व सर्गसंख्या
१) वैराग्यप्रकरण - ३३ सर्ग
२) मुमुक्षुव्यवहारप्रकरण - २० सर्ग
३) उत्पत्तिप्रकरण - १२२ सर्ग
४) स्थितीप्रकरण - ६२ सर्ग
५) उपशमप्रकरण - ९३ सर्ग
६) निर्वाणप्रकरण - ३४४ सर्ग (पूर्वार्ध व उत्तरार्ध)
----------------------------
मूळ हेतू - श्रीरामचंद्रांना अध्ययन संपवून, तीर्थाटन करुन आल्यावर जे वैराग्य आले होते, जी ब्रह्मजिज्ञासा निर्माण झाली होती, तिचे शमन श्रीविश्वामित्र ऋषींच्या व सर्व राजदरबाराच्या उपस्थितीत, अदृश्य रुपात देव-ऋषी-मुनी-सिध्द यांच्या उपस्थितीत श्रीवसिष्ठ ऋषींनी केले.
हे सर्व तत्वज्ञान जे जिज्ञासू आहेत, मुमुक्षू आहेत, जे सखोल साधना करणारे साधक आहेत त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.
---------------------
या ग्रंथाचा कर्ता निश्चित माहित नाही.
ग्रंथनिर्मितीचा कालखंडही निश्चित नाही.
५ वे शतक ते १२ वे शतक या दरम्यान असावा असे संशोधकांचे मत आहे.
--------------------------------------------------
मला हे दोन्ही खंड वाचताना अतिशय प्रसन्नता वाटली.
कितीतरी प्रश्नांची उत्तरे मला मिळाली.
जेवढे मला त्यातले महत्वाचे वाटले तेवढे या वेबसाईटवर देण्याचा प्रयत्न आहे.

॥श्रीराम समर्थ॥