सद्गुरु श्रीगोंदवलेकर महाराजांच्या चरित्राचे बोधसार

कितीवेळा मी बेलसरेबाबांनी लिहिलेले महाराजांचे चरित्र वाचले असेल कोण जाणे! प्रत्येकवेळेला मी नवीन नवीन शिकत गेले. त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घेत गेले. त्यांच्याविषयी वाटणार्‍या प्रेमामध्ये व आदरामध्ये सतत भर पडत गेली. तरीही महाराज मला कळले असे मी कल्पनेत सुध्दा म्हणणार नाही. त्यांचे चरित्र खूप खोल, विशाल आणि अतर्क्य आहे. सर्वसामान्य माणसाला संताचे मन कळणे शक्य नाही. मला तर माझा खुजेपणा, संकुचितपणा आणि देहबुध्दीचा खोटा स्वार्थीपणा नेहेमीच खटकतो. संताची निर्भयता, मनाची उत्तुंग उंची, प्रशांत विशालता, क्षमाशीलता, परमात्म्याशी असलेली तादात्म्यता मला कशी कळणार? त्यामुळेच मी माझ्या सद्‌गुरुचं चरित्र नेहेमी वाचनात ठेवते.
This e-book is for sell. To purchase it please click on
http://www.bookganga.com/eBooks/Book/5588259192969269389.htm?Book=Sadgur...
मूल्य - रु ७०/-