धार्मिक कार्ये

आदल्या दिवशी हॉटेलवर येऊन तेथील क्षेत्रोपाध्याय गुरुजींनी आपण या क्षेत्रात कोणकोणते धार्मिक विधी करु शकतो याची सविस्तर कल्पना दिली. प्रत्येकाची दक्षिणा सांगितली. प्रत्येक विधीचे महत्व थोडक्यात सांगितले.

- सुरुवातीला श्रीशंकराचार्यस्थापित स्फटिकलिंगदर्शन
- समुद्रस्नान, पिशवीत सेतू घेणे व सर्वतीर्थ स्नान
- रुमवर येऊन स्नान व नाश्ता
- गुरुजींच्या घरी जाऊन

  • श्राध्दविधी (पितरांचे श्राध्द)
  • सेतूमाधवपूजन (समुद्रातील वाळूचे)
  • श्रीपार्वतीपूजनसंकल्प व सौभाग्यवायनदान
  • गोप्रदान
  • ब्राह्मणभोजन
  • सुवासिनीभोजन
  • श्रीरामेश्वरपूजनसंकल्प

- मंदिरामध्ये जाऊन श्रीरामेश्वराचे (श्रीसीतामाईने तयार केलेले वाळूचे लिंगम्‌) दर्शन व गंगास्नान
- श्रीपार्वतीमातेचे दर्शन
- श्रीहनुमतेश्वराचे दर्शन (श्रीमारुतिरायाने कैलासाहून आणलेले लिंगम्‌)
- बिल्वार्चन
- परत येऊन प्रसाद भोजन विश्रांती
- संध्याकाळी समुद्रावर
- रात्री देवाची पालखी (श्रीरामेश्वराच्या पूजामूर्तीचे पालखीतून देवळातील प्रदक्षिणामार्गावर फिरुन श्रीपार्वतीमातेच्या मंदिरातील शयनगृहात प्रवेश व विश्रांति)
- परत येऊन भोजन व गुरुजींना दक्षिणाप्रदान
- पुढच्या प्रवासाची तयारी व विश्रांती

॥श्रीराम समर्थ॥