समुद्रस्नान व तीर्थस्नान

माझे अनुभव - डिसेंबर २००६ श्रीक्षेत्ररामेश्वरम्‌ -
या सर्व कुंड व तीर्थांवरच्या स्नानाचे माझे अनुभव -

पहाटे ३ वाजता उठून पारोसे आम्ही २ किमीचा मंदिराच्या आतला परिक्रमेचा भाग चालून मंदिरात गेलो.
आद्य शंकराचार्यांनी स्थापित केलेले पारदर्शी स्फटिक लिंगदर्शन आम्हाला गुरुजींनी करवले.
नंतर मंदिराच्या पिछाडीला असलेल्या समुद्रावर गेलो. तिथे ही गर्दी होती.

medium_ayyappaswamy pilgrims.jpg

डिसेंबरमध्ये अजून एक अय्यप्पास्वामींची यात्रा भरते. त्यामध्ये हजारो भाविक असतात. ते काळे कपडे घालून येतात. समुद्रस्नान झाल्यावर ते कपडे तिथेच सोडतात..जणू काही आपल्यामधील काळेपणाचा त्याग ते करतात.
या गर्दीत पुरुषच मला दिसले.
शिवाय नेहेमीचे यात्रेकरु होतेच.

medium_beach.jpg

पहाटे आम्ही समुद्रस्नान केले. पाणी गार होते. काहीजण, आपण कोठे व कशाला आलो आहोत याचे भान विसरुन, गोव्याला आल्यासारखे वागत होते. क्षेत्रोपाध्याय गुरुजी हे सर्व शांतपणे बघत होते. ते हसरे, विनोदी व उत्साही होते. त्यांच्या खांद्यांचा व हातांचा वापर मंडळींनी हॅंगर म्हणून केला होता.
सर्वांचे स्नान झाल्यावर गुरुजींनी आम्हाला थोडा सेतू (वाळू) प्लॅस्टिकच्या पिशवीत घ्यायला सांगितली.

समुद्रस्नान करुन आल्यावर क्षेत्रोपाध्याय सर्व यात्रिकांना मंदिरालगत असलेल्या पापविनाशक तीर्थांपाशी घेऊन गेले.
प्रथम पावती फाडावी लागते. जे सेवक कुंडातून, तळ्यातून तीर्थ काढून यात्रिकांना स्नान घालतात त्यांना त्यांच्या सेवेबद्दल ही रक्कम द्यायची असते.
आपल्याजवळच्या चीजवस्तू भिजू नयेत म्हणून त्यांची व्यवस्था संयोजक करतात. एक कोरड पंचा प्लॅस्टिक पिशवीत घालून तो बाहेर ठेवावा. नंतर डोकं कोरडं करायला उपयोगी पडतो.

प्रत्येक कुंडाजवळ एक सेवक असतो. यात्री त्याच्या कुंडापाशी आले की तो त्यांना ४ च्या गटात यायला सांगतो व ३-४ बादल्या कुंडातून तीर्थ काढून त्यांना सचैल (वस्त्रांसहित) डोक्यावरुन स्नान घालतो. ते पुढे गेले की पुढचा गट असे काम चालते.
हे सर्व काम सकाळीच चालते.
एकदा पावती दाखवल्यानंतर पुन्हा दाखवावी लागत नाही. पावती घेऊन आम्ही तीर्थांच्या ठिकाणी आलो. सर्वांचे पैसे गोळा करायला जरा वेळ लागला. प्रत्येकाची पावती करायला वेळ लागला. सर्व सोपस्कार झाल्यावर सर्वांनी एकत्र रहा असं आम्हाला सांगण्यात आलं. आत गर्दी खूप असते.
आपल्याबरोबर जे यात्री आले आहेत त्यांच्या बरोबर रहाणे गरजेचे असते त्यामुळे हिशोब ठेवणे सेवकांना सोपे जाते.
संयोजक व गुरुजी बाहेर थांबले आम्ही यात्री आत गेलो.
एकापाठोपाठ एक कुंड करीत २२ तीर्थ एका दमात पूर्ण करायची असतात.
दोन कुंडांमधलं अंतर कमीजास्त असतं.
मधली वाट पाण्याने निसरडी झालेली असते.

- medium_kotitirtham.jpg

लुंगी नेसलेले तामिळमध्ये बोलणारे सगळे लोक होते. अम्मा-स्वामी असे पुकारीत ते बादली आमच्या डोक्यावरुन उपडी करीत होते.
सुरुवातीला पाणी थंड वाटलं व कपडे चिकटल्यानं विचित्र वाटलं. नंतर सगळेच तसे दिसायला लागल्यावर संकोच गेला आणि रामनाम मुखी ठेवून मी त्या तीर्थाला नमस्कार करुन ते तीर्थ स्वीकारलं.

तेथील पाण्यामधलं वैविध्य

मला नंतर असं लक्षात येऊ लागलं हे नुसतंच पाणी नाहीये. प्रत्येक कुंडातलं पाणी खरच वेगळं आहे. त्याचे अनुभवही वेगळे आहेत.
काही ठिकाणचं पाणी
- कोमट होतं
- बर्फासारखं थंड होतं
- गुलाबाच्या फुलांच्या सुवासानं युक्त होतं
- गंधकयुक्त होतं
- गोड होतं
- खारट होतं
- शुभ्र होतं
- हिरवटकाळसर होतं
- पिवळसर होतं
- तुरट होतं
- शीतल प्रसन्नता देणारं होतं
- पवित्र करणारं होतं

असं सर्व तीर्थ पूर्ण होईपर्यंत मुक्यानं स्नान केलं. कोणाशी गप्पा नाहीत. कशालाही नावं ठेवणं नाही.
ही पापमोचनी असल्याने मोठी पर्वणी होती. पुन्हा इथे यायला जमणार नाही तेव्हा या संधीचा विनियोग मनापासून करावा असं मला कृतज्ञतेनं वाटलं.
--------------------------
महाराजांची आठवण -

येथे या क्षेत्रामध्ये श्रीमहाराज आले होते. एका रोगी आणि मरणोन्मुख शिवभक्ताला शिवदर्शन घडवून त्यांनी मुक्ती दिलवली होती. त्याचे अंत्यसंस्कार करवले होते.

तीर्थांची नावे -
- महालक्ष्मी तीर्थ
- सावित्री तीर्थ
- गायत्री तीर्थ
- सरस्वती तीर्थ
- सेतुमाधव तीर्थ
- गंधमादन तीर्थ
- सीता तीर्थ
- शिव तीर्थ
- नल तीर्थ
- नील तीर्थ
- चंद्र तीर्थ
- चक्र तीर्थ
- ब्रह्महत्याविमोचन तीर्थ
- सूर्य तीर्थ
- शंख तीर्थ
- गंगा तीर्थ
- यमुना तीर्थ
- गया तीर्थ
- अग्नी तीर्थ
- सत्यामृत तीर्थ
- पापविनाशी तीर्थ
- मंगल तीर्थ
- अमृपवापी तीर्थ
- सर्वतीर्थ
- कोटीतीर्थ
- रामकुंड
- लक्ष्मणतीर्थ
- धनुष्कोटीतीर्थ
- ऋणमोचनतीर्थ
-----------------------------
अग्नी तीर्थ
medium_agni.jpg

लक्ष्मण तीर्थ
medium_lakshman.jpg

सीता तीर्थ
sita.jpg

शिवतीर्थ
medium_siva.jpg

medium_sakkara.jpg

medium_squarish.jpg

medium_various wells 1.jpg

medium_well 2.jpg

medium_well 3.jpg

medium_well 4.jpg

medium_well 6.jpg

या तीर्थांची नावे मला गुगल सर्चवर मिळाली नाहीत.
मला फोटो काढता येणं शक्य नव्हतं.
-------------------------------------

----------------------------
काही घटना -
१)
- एक लहान मुलगा अचानक तिथल्या फरशीवर घसरुन पडला व बेशुध्द झाला, तिथेच त्याला फिट येऊ लागल्या. त्याला त्याच्या नातेवाईकांनी उचलून घेऊन जाताना मी पाहिले व पुढच्या तीर्थस्नानाला गेले. नंतर मलाच माझं आश्चर्य वाटलं माझ्यातल्या एका डॉक्टरच्या मनोभूमिकेत पडलेला बदल विलक्षण होता. एकतर मी मेडिकल प्रॅक्टिस करीत नाही. तिथे त्या मुलाला मदत करायला अनेकजणं होते आणि मला त्यांची भाषा समजत नाही. तिथली वैद्यकीय व्यवस्था मला माहित नाही, शिवाय मी इथे तीर्थयात्रेला आलेय ते कर्तव्य मनोभावे करणं या जन्मातील पापनाशनाच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे हे मी नंतर रुमवर गेल्यावर स्वतःला सांगत राहिले..पण अजूनही ते चित्र मला आठवते..त्या मुलाचं नंतर काय झालं असेल? अशा तीर्थक्षेत्री त्याच्या बाबतीत असं कसं काय घडलं? त्याच्या आईवडीलांनी त्याची नीट काळजी घेतली नाही का?...
शेवटी ही नियती आहे..परमेश्वराची माया गहन आहे..आपल्याला सर्व उत्तरं इथं मिळणार नाहीत असं मी स्वतःला समजावते.

२)
तिथे अनेक अपंग, मतिमंद, विकलांग मुलांना घेऊन सुशिक्षित पालक आले होते. ते आपल्या पाल्याला स्नान घालून घेत होते. काहीजण व्हीलचेअरवर होते. त्यांच्याकडे व त्यांच्या पालकांकडे बघून करुणा येत होती.
मला समन्वयची आठवण झाली. मी एकटीच यात्रेला आले होते. घरातल्या कोणालाच अशा धार्मिक यात्रेत जरासुध्दा गम्य नव्हतं.
समन्वयला "येतोस का?" असं मी विचारलं होतं. तो नाही म्हणाला होता व ते माझ्या पथ्यावर पडलं होतं कारण चारधाम यात्रेपासून यात्रा कशाशी खातात याची मला कल्पना आली होती. समन्वयला हे सर्व झेपणारं नाही हे मला कळत होतं. तरीपण पुढच्या एखाद्या सोप्या यात्रेला त्याला न्यायचं असं मी ठरवलं

३)
आमच्यातील एक लहानपणी पोलिऒ झालेली व जयपूर फूट न वापरणारी बाई अशीच घसरुन पडली. तिचे बंधू बरोबर होते, भावजयी होत्या. हे सर्व लोक तिची काळजी घेत होते. ती स्वभावानं विचित्र, भांडकुदळ, देवाधर्मावर फारसा विश्वास नसलेली होती. ती इतर नातेवाईकांच्या आग्रहाखातर आली होती. सर्व तीर्थयात्रा पूर्ण झाली तर ती तशीच निर्लेप राहिली. ती सतत खाणंपिणं मज्जा पैसा एवढच बोलत होती.

॥श्रीराम समर्थ॥