अमानीत्व

- महाराज कधीही कोणाचे मिंधे राहिले नाहीत.
- त्यांनी कधीही कोणापुढे हात पसरला नाही.
- महाराजांनी कधी कोणाकडून वर्गणी गोळा केली नाही.
- त्यांनी आपला चरितार्थ अगदी स्वतंत्र ठेवला.
- त्यांच्यापुढे कोणी पैसा ठेवला तर त्याचा अनादर केला नाही.
- स्वप्नातसुध्दा कोणाकडून त्यांनी कधी अपेक्षा केली नाही.
- अनेकांना पोसूनसुध्दा "मी त्यांचा पोशिंदा आहे" ही भावना त्यांना कधी शिवली नाही.
- दुसर्‍यासाठी झिजल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे.
- पैशाचे मिंधेपण नसल्याने त्यांना आपल्या मतांना मुरड घालण्याचा प्रसंग कधी आला नाही.
- ज्या कोणाला भगवंत हवा होता त्याला त्यांच्याकडे स्थान मिळाले.
- श्रीमंतांना त्यांच्या श्रीमंतीचा देखावा करण्याची गरज भासली नाही.
- महाराजांना लौकिकाचा, प्रसिध्दीचा, वर्तमानपत्री चर्चेचा आणि व्यासपीठावरील व्याख्यानांचा अगदी मनापासून कंटाळा होता. त्यांनी फार कटाक्षाने प्रसिध्दी टाळली. महाराज पूर्वकाळात आपले नावही नीट सांगत नसत. खर्‍या नावाऐवजी "जंगम/नंगा बैरागी/कानफाटा योगी/पंढरीचा वारकरी/रामदासी असे सांगत असत. ते म्हणत," भगवंताच्या नामाला खरे महत्व आहे; सांगणारा कोणी का असेना!".

॥श्रीराम समर्थ॥