गुरुत्वाची लक्षणे

संदर्भ (आद्य श्रीशंकराचार्य - उपदेशसाहस्री)

गुरुचे लक्षणे व कर्तव्ये -
१) ऊहापोह
२) ग्रहण
३) धारण
४) शम
५) दम
६) दया
७) अनुग्रहसंपन्न
८) लब्धागमः
९) दृष्ट-अदृष्ट भोगेषु अनासक्तः
१०) त्यक्तसर्वकर्मसाधनः
११) ब्रह्मवित्‌
१२) ब्रह्मणि स्थितः
१३) अभिन्नवृत्तः
१४) दंभ-दर्प-कुहक-शाठ्य-माया-मात्सर्य-अनृत-अहंकार-ममत्व आदिदोषवर्जितः
१५) केवलपरानुग्रहप्रयोजन
१६) विद्योपयोगार्थी

ही सर्व लक्षणे महाराजांच्या ठिकाणी ओतप्रोत होती. तरीही -
- महाराजांनी आपल्या शिष्यांना शिष्यपणाने कधीच पाहिले नाही.
- अहोरात्र हर प्रयत्नाने शिष्याला त्यांनी कृतार्थ करण्याचा प्रयत्न केला.
- आपल्या शिष्यांशी ते बरोबरीच्या नात्याने वागत.
- प्रत्येक माणसात भगवंताकडे जाण्यास उपयोगी पडणारा काहीतरी गुण असतोच. त्या गुणाचा उपयोग व विकास करून भगवंताकडे कसे जावे हे प्रत्येकाला शिकविण्याचे काम ते करीत. म्हणून ते प्रत्येकाला जवळचे वाटत.
- त्यांचे व्यक्तिमत्व अनेकरंगी असल्याने सर्व पुरुष व स्त्रिया त्यांच्याशी अगदी मनमोकळेपणाने वागत व बोलत. तेही एखाद्या प्रेमळ पित्याप्रमाणे सर्वांच्या प्रपंचाच्या सर्व गोष्टी शांतपणे ऐकून घेत.
- दुसर्‍याने थोडे जरी केले तरी त्याचा ते मोठा गौरव करीत.
- ज्यांना जगात प्रेम मिळाले नाही त्यांना ते खरे प्रेम देत.
- ज्यांना कोणाचा आधार नाही त्यांना खरा आधार देत.
- ज्यांना विफलता आली असेल त्यांना धीर देऊन ते ध्येयाकडे जाण्याचा मार्ग दाखवून देत.

॥श्रीराम समर्थ॥