सुसंस्कृता

- महाराजांच्या मनात स्त्रियांबद्दल फार आदर होता व ते त्यांना पूज्य मानीत.
- त्यांच्या विनोदांमध्ये कधीही अश्लीलता नसे.
- ते असे सांगत की," स्त्रियांनीच आत्तापर्यंत धर्म टिकवून धरला. त्यांनीच समाजातील नीतीमत्ता टिकवून धरली. त्या कुटुंबासाठी खस्ता खातात. त्या पुरुषांपेक्षा जास्त निःस्वार्थी असतात. ज्या घराण्यात स्त्रिया सुज्ञ असतात ती घराणी चांगली चालतात."
- ते दुःखी व कष्टी स्त्रियांशी अत्यंत सहानुभूतीने, वात्सल्याने आणि प्रेमाने वागत.
- आई व आईच्या प्रेमाविषयी बोलणे निघाले तर त्यांचा गळा भरुन येत असे.
- "आई म्हणजे भगवंताच्या प्रेमाची प्रापंचिक मूर्ति!" असे ते म्हणत.
- "स्त्रियांचे अंतःकरण जात्याच शुध्द असल्याने भगवंताचा मार्ग त्यांना सोपा आहे." असे ते म्हणत.

॥श्रीराम समर्थ॥