उदारता व प्रेमळपणा

महाराजांना आलेले कटू अनुभव
- अनेकांनी त्यांना त्रास दिला.
- काहींनी त्यांची अवहेलना केली.
- काहींनी त्यांची उपेक्षा केली.
- काहींनी त्यांना तुच्छतेने वागवले.
- काहींनी त्यांना उगीचच विरोध केला.
- काहींनी त्यांची भरमसाठ निंदा केली.
- काहींनी त्यांची अवास्तव स्तुति केली.
- काही त्यांना भोंदू व लबाड म्हणत.
- काही त्यांना गर्विष्ठ व व्यवहारी म्हणत.
- काही न पाहता उगीचच गैरसमज करून घेत.

मात्र या सर्व प्रकारच्या लोकांशी महाराजांचे वागणे उदारपणाचे व प्रेमळपणाचे असे.
कोणाला त्यांनी रागावून दूर केले नाही.
महाराज कमालीचे अविचलित राहत.
मात्र, भगवंताच्या/नामाच्या/संताच्या उलट कोणी बोलला तर ते त्याचे आव्हान स्वीकारून भांडायला उभे ठाकत. त्यावेळी त्यांच्या जवळच्या सर्व शक्ती ते पणाला लावत व त्याचे मतपरिवर्तन करीत.

॥श्रीराम समर्थ॥