त्याग

- महाराज म्हणजे मूर्तीमंत त्यागच होते.
- काम, कांचन व कीर्ति या तीन अत्यंत प्रभावी शक्तींविषयी त्यांच्या ठिकाणी पूर्ण निर्वासना होती.
- सर्व संपत्ती व कीर्ति पायाशी चालून येत असताना महाराजांनी त्यांची तुच्छतेने उपेक्षा केली होती.
- त्यांनी त्यांच्या त्यागाचे कधी बंड माजवले नाही.
- त्यांच्या त्यागात मोठे सामर्थ्य होते.
- आधी त्यांनी त्याग केला आणि मग लोकांना सांगण्यास सुरुवात केली.
- त्यांच्या या त्यागाच्या बळावरच एवढे मोठे कार्य झाले.

॥श्रीराम समर्थ॥