मृत्यूनंतर पापी माणसाचे काय होते?

मृत्यूनंतर पापी माणसाचे काय होते?

पहिले १० दिवस

मृत्यूनंतर अग्निसंस्कार केल्यानंतर पिंडापासून पुन्हा एक देह निर्माण होतो की जो हातभर उंचीचा असतो. या देहाद्वारे जीव यमाच्या मार्गातील शुभ किंवा अशुभ भोग घेतो.

ह्या दहा दिवसांमध्ये मृत व्यक्तीचे मुलगे जे पिंडदान करतात ते पिंड रोज चार भागांमध्ये विभागलं जातं. त्यातले दोन भाग पंचमहाभूतांद्वारा देहाला पुष्ट करतात. तिसरा भाग यमदूतांसाठी असतो आणि चौथा भाग स्वत: प्रेत खाते. अशा प्रकारे दहा दिवस पिंड खाल्ल्यामुळे जो देह उत्पन्न होतो तो यमापर्यंतच्या मार्गावर चालण्यासाठी त्या पिंडातून सामर्थ्य मिळवतो.

प्रत्येक दिवशी जो पिंड दिला तो विविध अवयवांच्या निर्मितीसाठी उपयोगात येतो.

पहिला दिवस – डोके, दुसरा दिवस – मान, खांदे, तिसरा दिवस – हृदय, चौथा दिवस – पाठ, पाचवा दिवस – नाभी, सहावा दिवस – कंबर, गुह्यभाग, सातवा दिवस – पृष्ठभाग, आठवा दिवस – गुडघे, नववा दिवस – पावले, दहाव्या दिवशी त्याला तहानभूक निर्माण होते.

संदर्भ - गरूडपुराण

॥श्रीराम समर्थ॥